११ ऑक्टोबर घटना
घटना
- १६३४: बर्चर्डीचा पुर – या पुरामुळे नॉर्थ फ्रिसलँड, डेन्मार्क आणि जर्मनीमध्ये किमान १५ हजार लोकांचे निधन.
- १८११: ज्युलियाना फेरी जहाज – न्यूयॉर्क बंदरातील पहिली वाफेवर चालणारी फेरी सुरू झाली.
- १८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी – ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ, सिडनी येथे सुरु झाले.
- १९४४: सोव्हिएत युनियन – तुवान पीपल्स रिपब्लिक जोडून घेतले.
- १९५८: पायोनियर १ – नासाने पहिले अंतराळ संशोधन प्रक्षेतीत केले.
- १९६८: अपोलो ७ – नासाने पहिली यशस्वी मानवयुक्त अपोलो मोहीम प्रक्षेपित केली.
- १९८४: कॅथरीन डी. सुलिव्हन – या स्पेस वॉक करणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन अंतराळवीर बनल्या.
- १९८७: ऑपरेशन पवन – श्रीलंकेत भारतीय सैन्याने ऑपरेशन पवन सुरू केले.
- २०००: STS-92 – नासाचे १००वे स्पेस शटल मिशन प्रक्षेपित केले.
- २००१: पोलरॉईड कार्पोरेशन – दिवाळखोरी जाहीर केली.