१२ डिसेंबर जन्म
जन्म
- १९८१: युवराजसिंग – भारतीय क्रिकेटपटू – पद्मश्री
- १९५२: हरब धालीवाल – भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी
- १९५०: रजनीकांत – भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते – पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
- १९४९: गोपीनाथ मुंडे – महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री
- १९४८: अस्लम आझाद – भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार
- १९४०: शरद पवार – महाराष्ट्राचे ७वे मुख्यमंत्री, राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष – पद्म विभूषण
- १९३७: भवरलाल जैन – जैन इरिगेशन सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक – पद्मश्री
- १९३४: मिगुएल दे ला माद्रिद – मेक्सिको देशाचे ५२वे अध्यक्ष, बँकर, शैक्षणिक आणि राजकारणी
- १९२७: रॉबर्ट नोयस – इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक
- १९२६: रोमन कोरियटर – आयमॅक्सचे सहसंस्थापक
- १९२५: दत्ता फडकर – भारतीय क्रिकेटर
- १९१५: फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक
- १९०७: खेमचंद प्रकाश – संगीतकार
- १९०५: डॉ. मुल्कराज आनंद – लेखक
- १८९२: गौरीशंकर जोशी – गुजराथी कथाकार व कादंबरीकार
- १८८१: हॅरी वॉर्नर – वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक
- १८७२: डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – भारतीय राजकीय नेते, हिंदू महासभेचे संस्थापक